आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांबातील अंतर असेल जवळपास 120 मीटर:आता मलेशियन तंत्रज्ञान वापरून होणार उड्डाणपूल

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून नागपुरात प्रथमच उड्डाणपुलाचे बांधकाम होत आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामाची किंमतही कमी झाली असून अधिकचे भूसंपादन करण्याची गरज पडत नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.नागपुरातील मोमिनपुऱ्यातून जाणारा या उड्डाणपुलात मलेशियन तंत्रज्ञान वापरले आहे. या उड्डाणपुलामुळे वेळेची बचत होणार असून मोमिनपुऱ्यातून चढल्यानंतर थेट कामठी रोडवर उतरता येणार आहे. २.८ किमीच्या या पुलासाठी इंचभरही जमीन जाणार नाही. कारण यासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरले आहे.

एरव्ही उड्डाणपूल बांधताना त्यासाठी लागणाऱ्या २ खांबामधील अंतर साधारणत: १० ते ४० मीटर असते. पण यात ते १२० मीटरपर्यंत वाढवू शकताे. परिणामी खांबांची संख्याही कमी होईल. पारंपरिक एम-४० ग्रेड साधारण काँक्रीटपेक्षा फायबरमध्ये प्रिकास्ट बिम १००% मजबूत असते. पारंपरिक बिमपेक्षा वजनाने ३५% हलके असते. दाब व ताण सहन करण्याची क्षमता आणि लवचिकता वाढते. या तंत्रज्ञानामुळे १६०० कोटीऐवजी १ हजार कोटीत हा पूल हाेणार आहे.