आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:ओबीसींना राजकीय आरक्षणाचा फायदा न देणारा झारीतील शुक्राचार्य कोण? भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

“ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. यात सरकारमधील नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत आहे, असे म्हणतात, मग अजून काही का होत नाही? कोण आहे झारीतील शुक्राचार्य ज्याला ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही?’ असा सवाल भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. यात २०२२ नंतर होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ द्यायच्या आहेत. यात मोठे षड्््यंत्र आहे. कुणीतरी मोठी व्यक्ती यामागे आहे. याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घेऊन जनतेला सांगावे. काही प्रश्न ओबीसी आरक्षणासंदर्भात आहेत. त्याचे उत्तर द्यावे, असेही बावनकुळे म्हणाले. ते शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी बोलत होते. “लोणावळा येथे झालेल्या चिंतन शिबिरात शेवटच्या दिवशी ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ओबीसीचा इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम चालू करणार असा निर्णय झाला. परंतु राज्य मागासवर्गीय आयोगाचे डेटा तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही.

यामुळे यात काळेबेरे आहे, म्हणून उशीर होत आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी तैलिक महासंघाच्या वतीने राज्यभर निदर्शने केली जाणार आहेत. ज्या संघटना ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असेल, त्यांच्या पाठीशी भाजप राहणार, असेही ते म्हणाले. यात राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू केले आहे आणि तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे, परंतु असे अजूनही झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप रद्द झाल्या नाहीत. एकदा या निवडणुका झाल्या तर मग सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रेसिडेंट तयार होईल. यानंतर सर्व निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार, असेही बावनकुळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...