आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाचा वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला:वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या नाहबी गावात वाघाने वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना पुढे आली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

वन प्रशासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली आहे. रामटेक तालुक्यातील नाहबी येथील शेतकरी आपल्या शेतात गवत कापायला गेला असता सायंकाळच्या वेळी लपून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. नंदू लक्ष्मण सलया असे असून ते वयोवृद्ध शेतकरी होते. नंदू सलया रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. शेतामध्ये गवत कापायला गेले असल्यामुळे त्यांच्या मुलाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे तुकडे शेतात इकडे तिकडे पडलेले दिसले. तर शेतामध्ये वाघ फिरत असल्याचेही त्यांच्या मुलाला दिसले. यानंतर वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...