आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारी 2 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांनी एका दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाला जीवनदान देत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. 2 ऑगस्ट रोजी रात्री 11ः30 वाजता सागर चौधरी यांनी मुकेश चौहान यांना फोन करून त्यांच्या घरी साप निघाल्याचे सांगितले. या सापाबद्दल एक अंधश्रद्धा अशी आहे की, हा साप गुप्त धन शोधण्यात मदत करतो. त्यामुळे अनेकदा त्याला पकडण्यात येते. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वन्यजीव कल्याण संस्थेचे सचिव नितीश भांडक्कर यांनी केले आहे.
माहिती मिळताच सागरने क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र आकाश शेंडे सोबत चौधरी यांचे घर गाठले. त्याला रेड सॅन्ड बोआ (मांडुळ) प्रजातीचा दुर्मिळ साप दिसला. साप निघाल्याचे कळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी जमण्यास सुरूवात झाली. परंतु सर्पमित्रांनी लागलीच सापाला तिथून नेत नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
यापूर्वीही निघाला होता साप
पराजधानी नागपुरात यापूर्वीही मार्चमध्ये दुर्मिळ जातीचा फॉस्टेन कॅट साप आढळला होता. वाठोडा चौक येथे ट्रक दुरुस्तीच्या गॅरेज जवळील 35 फूट झाडावर 5 फूट लांबीचा साप दिसल्यामुळे लोकांची गर्दी जमली होती. ही माहिती सर्पमित्र अंकित खळोदे व आदर्श निनावे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शिफातीने सापाला झाडावरून रेस्क्यू केले.
निर्जन ठिकाणी मुक्त
रेस्क्यू केलेला साप हा दुर्मिळ जातीचा फ़ॉस्टेन कॅट असून शहरात पहिल्यांदाच आढळला. हा साप निमविषारी गटात मोडतो तसेच या सापाचे मुख्य खाद्य छोटे पक्षी, पाली, उंदीर, वटवाघूळ आहे. हा साप झाडांवर तसेच रात्री जंगलातल्या रस्त्यांवर सुद्धा पाहायला मिळतो. साप आढळलेल्या ठिकाणी गॅरेज असल्यामुळे बाहेरील प्रदेशातील ट्रक दुरुस्तीसाठी येतात. वाहतुकीत एखाद्या ट्रकमध्ये हा साप शहरात आला असावा. ह्या दुर्मिळ जातीच्या सापास आवश्यक असलेल्या अधिवासाचा विचार करून निर्जन ठिकाणी मुक्त करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.