आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी वर्षातील शेवटचे ग्रहण:महाराष्ट्रातून दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण; 8 नोव्हेंबर​​​​​​​ला 3 तास पाहायला मिळणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच 25 ऑक्टोंबरला खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून मंगळवार 8 नोव्हेंबर पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वोत्तर भागात सर्वाधिक 98% आणि 3 तास ग्रहण पहायला मिळणार आहे. तर पश्चिम भारतातून केवळ 1 तास 15 मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. राज्यात गडचिरोली जिल्ह्यातून 5.30 वाजता तर मुंबई येथून 6.01 वाजता चंद्रोदयातच ग्रहण सुरू होईल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणण स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

8 नोव्हेंबर 2022 ला दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया तसेच उत्तर दक्षिण अमेरिकेच्या काही भागातून दिसेल. पूर्वोत्तर भारताचे टोक असलेल्या अरूणाचल प्रदेशात चंद्र उगववताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असताना पाहता येणार नाही. भारतीय वेळेनुसार 8 तारखेला दुपारी 1.32 वाजता छायाकल्प तर दुपारी 2.39 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरूवात होईल. दुपारी 3.46 मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. आणि 5.11 मिनिटांनी ग्रहण संपेल. सायंकाळी 6.19 मिनिटांनी खंडग्रास ग्रहण तर 7.26 निमिटांनी छायाकल्प ग्रहण समाप्त होईल.

पृथ्वी सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये 5 अंशांचा 9 चा कोन आहे. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते.

पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही.

वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते.

इसवी सन 1901, 1905; 1908,1912; 1919, 1923, 1926, 1930; 1937, 1941; 1948, 1952; 1955, 1959; 1966, 1970; 1973, 1977; 1984, 1988; 1995, 1999 ह्या विसाव्या शतकातील 22 वर्षी चंद्रग्रहणे नव्हती.

बातम्या आणखी आहेत...