आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावनविभागाने सापळा रचून वन्यजीव अवयवांची तस्करी करणाऱ्यास अटक केली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले अवयव तपासणीसाठी बुधवारी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने नागपुरातील शिवशंकर एजन्सी या दुकानात बनावट ग्राहक पाठवला. तिथे अपेक्षित अवयव मिळताच बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पथकाने छापा मारला. तेथून अवयव जप्त केले. तसेच दुकान मालक मयूर मधुसूदन गुप्ता (वय ३३) लाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून घोरपडीच्या अंगाचे अवयव असलेल्या हाताजोडीचे १८ नग, प्रवाळावर पोसणारा किटक सी-फॅन्स व घोरपडीचा प्रकार असलेल्या प्राण्याच्या डोक्याचा वरचा रंगमाही हा भाग जप्त केला आहे. रंगमाही हा गुप्त धन तसेच अघोरी प्रकारात वापरला जातो. तर प्रवाळावर पोसल्या जाणारा सी-फॅन्स हा किटक घरात शुभशकून म्हणून लावल्या जातो. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.