आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना अटक:50 लाखांची लाच घेताना  चंद्रपूरमध्ये एकास अटक, दोन कोटींचे बिल, 3 अधिकाऱ्यांनी मागितले 80 लाख

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापुरी बंधारा कामाच्या सर्वेक्षणानंतर उर्वरित देयक देण्यासाठी तीन अधिकाऱ्यांनी ८० लाख ७२ हजार ५२६ रुपयांची लाच मागितली. या लाचेच्या रकमेपैकी ५० लाख रुपये घेताना जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार मृद व जलसंधारण विभागाच्या निविदा १० वर्षांपासून घेत आहेत. त्यांनी मार्च २०२२ मध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम निविदा भरून मिळवले. हे काम १८ एप्रिल २०२२ रोजी पूर्ण झाले. कंत्राटदाराला नागपूर आणि वर्धा येथील कामाचे ६२,८२,०१८ रुपयांचे देयक नागपूर कार्यालयातून तर १ कोटी २६ लाखांचे देयक चंद्रपूर कार्यालयाकडून मिळणार होते. हे संपूर्ण देयक मंजूर असून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील बिलाची २०,५५,९३९ ही ४० टक्के रक्कम तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील देयकाची ४९ लाख ४९ हजार ही ४० टक्के रक्कम कंत्राटदाराला धनादेशाद्वारे प्राप्त झाली होती. नागपूर येथील जिल्हा जलसंधारण तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (वर्ग-१) कविजीत पाटील, उर्वरित. पान १०

बातम्या आणखी आहेत...