आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरमोरी तालुक्यातील घटना:आरमोरीमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

गडचिरोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरपणाची लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे गुरुवारी सकाळी घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम (४५, रा. इंजेवारी) असे मृताचे नाव आहे. गेल्या महिनाभरातील आरमोरीत वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याची ही तिसरी घटना आहे. वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी दरम्यान असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात फरफटत नेले. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एकाने हे दृश्य पाहून गावात माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...