आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला संपवून आत्महत्या:पत्नी मुला-मुलीसह पाच जणांची हत्या करून स्वतः फासावर लटकून दिला जीव; कौटुंबिक कलहातून नागपुरात संपले अख्खे कुटुंब

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

कौटुंबिक कलहातून नागपुरात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. पाचही जणांना मारून मारेकऱ्याने स्वत: आत्महत्या केली आहे.

अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री आरोपीने या क्रूर हत्या केल्या आहेत. मृतकांमध्ये पत्नी विजया आलोक माथुरकर, मुलगी परी माथुरकर (वय १४), मुलगा साहील माथुरकर (वय १२), सासू लक्ष्मी देवीदास बोबडे व मेहुणी अमीषा देवीदास बोबडे यांचा समावेश आहे.

आलोक माथुरकर टेलरिंगचा व्यवसाय करतो. तो पाचपावली नजीक रंभाजी रोडवर बागल व्यायाम शाळेजवळ किरायाने राहतो. तर सासू व मेहुमी त्याच्या घरापासून १०० मीटर अंतरावर पटवी गल्ली येथे राहात होते. रविवारच्या मध्यरात्री आलोकने आधी सासूच्या घरी जाऊन सासू व मेहुणीची हत्या केली व नंतर घरी येऊन पत्नी व मुलांची हत्या करीत स्वत: फाशी लावून घेतली.

आलोक माथूरकर नावाच्या या मारेकऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवले. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपुरातील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने शहर आणि आसपासचा परिसर हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. ही हत्या का करण्यात आली आहे या बाबत मारेकरी असलेल्या आलोकने काही पत्र लिहून ठेवले का याचा तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...