आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्मयोगी बाबा आमटे यांची नात शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. दरम्यान, शीतल आमटे यांनी त्यांच्या दोन कुत्र्यांसाठी नागपूर येथील केमिस्टकडून पाच इंजेक्शन्स मागवल्याचे तपासात समोर आले आहे. शीतल आमटे यांच्याकडे असलेली दोन कुत्री पिसाळल्यासारखी करत होती. त्यांच्यासाठी ही इंजेक्शन्स मागवले असण्याची शक्यता आहे. मात्र, मागवलेल्या इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ सापडल्याने मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. हे हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
या संदर्भात पशुवैद्यकीय तज्ज्ञ तसेच जाणकारांशी संपर्क साधला असता आजारी कुत्र्यांना अॅस्नेथेशिया देण्यासाठी तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना त्याच्या मालकाच्या संमतीने ‘इच्छामरण’ देण्यासाठी अशा इंजेक्शन्सचा उपयाेग होतो, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शीतल आमटे यांनी यापैकी नेमके कोणते इंजेक्शन वापरले हा पोलिस तपासाचा भाग आहे. मात्र, अशा इंजेक्शनचा हाय डोस घेतल्यास मृत्यू होऊ शकतो, असेही या क्षेत्रातील तज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती सांगितली. दरम्यान, प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खरे कारण कळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.