आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेत महावितरणमधील नाेकरभरतीवर चर्चा सुरू असतानाच पत्रकार गॅलरी वगळून सभागृहातील एका बाजूचा वीजपुरवठा अंतर्गत वायरिंगमधील बिघाडामुळे खंडित झाला. यामुळे सभागृह पहिल्यांदा दहा मिनिटे, दुसऱ्यांदा १५ मिनिटे आणि तिसऱ्यांदा अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. वीज मंडळाच्या भरतीवर चर्चा सुरू असताना वीज गेल्याने सदस्य आणि उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महावितरणमधील पदभरतीबाबत उत्तर देत असताना वीज गेल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा माइक बंद झाला. त्यामुळे त्यांचा आवाजच येत नव्हता. परिणामी अध्यक्षांनी दहा मिनिटे सभागृह तहकूब केले. त्यानंतर आलेले तालिका सभापती संजय शिरसाट यांनीही वीज न आल्यामुळे परत १५ मिनिटे तहकूब केले. या वेळी विराेधी बाकावरील सदस्यांनी जाणीवपूर्वक माइक बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असाे अशा घोषणा देताच सभागृहात वातावरण एकदमच बिघडले. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आले तरी वीज आली नसल्याने सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केले. दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी पत्रकार गॅलरीतीलही वीज गेली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.