आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:विरोधक खोटे आरोप करताहेत, नागपुरात भाजयुमोचे आंदोलन

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेदान्त फाॅक्सकाॅन, टाटा एअरबस, सॅफराॅनसह अन्य प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये नेण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्पांच्या या पळवापळवीवरून शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर युवक काँग्रेस हे आंदोलने करून खोटी माहिती पसरवत आहेत. विरोधक खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी दुपारी नागपूरच्या आयटी पार्क चौकात आंदोलन केले व महाविकास आघाडीचा निषेध केला. महाविकास आघाडीच्या काळात राज्याबाहेर गेलेले प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळे बाहेर गेल्याचे आरोप करून विद्यमान सरकारला विरोधक बदनाम करीत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमोने केला. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार चांगले काम करीत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पत्रकार परिषद घेत बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे भाजयुमो अध्यक्ष शिवानी दाणी यांनी सांगितले.

प्रकल्पांच्या ळवापळवीविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी तीव्र आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ त्रिकोणी पार्क जवळील निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. यापूर्वी प्रदेेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

बातम्या आणखी आहेत...