आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग तीन वर्षांपासून विदर्भात संत्र्याची फळगळ होत आहे. यात 90 हजार हेक्टरमधील बागांचे नुकसान झाले व होत आहे. या नुकसानीचे वेळोवेळी सर्वेक्षण झाले. परंतु, राज्य सरकारने आजवर एक रुपयाची नुकसान भरपाई संत्रा उत्पादकांना दिलेली नाही.
केवळ कापूस, तूर व सोयाबीन उत्पादकच नव्हे तर संत्रा उत्पादक शेतकरीही पुरता संकटात सापडला आहे. वातावरणीय बदल, वारंवार येणारी कीड आणि अवकाळी पावसामुळे संत्रा आणि आंबीया बहाराच्या सुमारे 90 टक्के संत्र्याचे फळगळतीमुळे नुकसान झाले आहे. संत्रा सरणालाही उरला नसल्याची वेदना संत्रा उत्पादक शेतकरी तसेच महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ यांनी मांडली.
आंबीया बहारासाठी संत्रा झाडाला ताण द्यावा लागतो. त्यानंतर तीन महिने नंतर फुलाेरा येतो. नेमकी याच वेळी अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे फुलाेरा येणार नाही. तर अनेक ठिकाणी फळगळती झाल्याची माहिती महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी दिली. यावर्षी अतिवृष्टीने हाहाकार माजवला. कापूस, तुर, सोयाबीनसह संत्र्यालाही याचा फटका बसला आहे. पावसामुळे फळबागांमध्ये पाणीच पाणी आहे. संत्रा मोसंबीची फळगळती थांबलेली नाही. 90 टक्के संत्रा गळून पडला. यामुळे रंग आणि गोडवा येत नाही. ऊन मिळत नाही तोपर्यत रंग येत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
विदर्भात 1 लाख 55 हजार हेक्टरवर संत्रा होताे. त्यापैकी 1 लाख 10 हजार हेक्टर उत्पादनात आहे. यापैकी 40 हजार हेक्टरमध्ये मृग बहार होता. आंबीया बहार 60 हजार हेक्टरवर होता. लेहगाव, कारंजा घाडगे, आष्टी, मोर्शी, वरूड पुसला या भागात मोठ्या प्रमाणावर गारपीटीमुळे फळगळती झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यातून वाचलेल्या संत्र्याचे माेर्शी जवळील मायवाडी केंद्रावर ग्रेडींग कोटींग सुरू झाले आहे, असे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.
विदर्भात डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था तसेच कृषी विभागाची यंत्रणा असूनही फळगळतीवर कोणाकडेच उपाय नाही. 4 जानेवारीला झालेल्या संत्रा फळगळ समितीच्या बैठकीत मनोज जवंजाळ यांनी संशोधन करून फळगळतीवर कायमस्वरूपी उपायाची गरज व्यक्त केली. त्यावर सर्वांचे एकमत झाले. एनआरसीसीने मागे सुचवलेल्या फळगळतीवरील उपायामुळे फळगळती थांबली नाही, असे संत्रा उत्पादक शेतकरी मनोज जवंजाळ यांनी स्पष्टपणे सांगितले. संत्र्यांची 20 किलोची एक पेटी असते. यात किती फळे बसतात, यावर संत्र्याच्या गुणवत्तेचे मोजमाप होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.