आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान स्‍पर्धा:ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भस्तरीय जुगाडू इंजिनिअर्स स्पर्धेचे आयोजन

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण्यात आले आहे. जुगाडू तंत्रज्ञानाने तयार केलेली कोणतीही वस‍तू किंवा यंत्र जे शेतीसाठी, कारखान्यासाठी किंवा दररोजच्‍या जीवनात कामात येणारी, घरगुती अशा कुठल्याही विषयाशी संबंधित वस्‍तू किंवा यंत्र आपण तयार केले असल्‍यास आपल्‍याला या स्पर्धेत भाग घेता येईल. या स्पर्धेसाठी प्रवेश नि:शल्‍क असून वय व शिक्षणाची देखील अट नाही. प्रवेश अर्ज व जुगाडू यंत्र व वस्‍तूचे व्‍हिडिओ पाठवण्‍याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२२ आहे.

या स्पर्धेतून निवडले गेलेल्या उत्कृष्ट जुगाडू वस्‍तू किंवा यंत्रासाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून प्रथम बक्षिस १० हजार, द्वितीय ७,५०० व तृतीय ५ हजार रूपये राहिल. रामनगर मैदान, नागपूर येथे येत्या, २२ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्‍या ग्रामायण प्रतिष्ठानच्या प्रदर्शनात माॅडेल प्रदर्शित केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. फाॅर्म भरताना व्हिडीओ व छायाचित्र अपलोड करावे लागेल. एक स्पर्धक जास्तीत जास्त ५ व्हिडीओ अपलोड करू शकेल. व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्यक्ष वापरात असलेल्या माॅडेलची माहिती सांगावी. gramayanpratishthan@gmail.com या मेलवर पाठवावे. अधिक माहितीकरता डॉ. कविता देशमुख ९८९०३०६३९२, राहूल बडगे ९८९००१७४४२, नरेंद्र कुळकर्णी ९३७३००९००१, अरविंद अग्रवाल ९८८१२४४४९० या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...