आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Orphan Data Updates: Over Three And A Half Thousand Children Lost Parents In Three Days; 59 Children Lost Mother And Father Too; News And Live Updates

धक्कादायक:तीन दिवसांत दीड हजारावर मुलांनी गमावले पालक; 59 मुलांनी गमावले आई आणि वडीलही

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या बालकांची जबाबदारी महिला व बालविकास खात्यातर्फे घेतली जाणार अाहे

राज्यात रविवार (२३ मे) पर्यंत कोरोनामुळे सुमारे १९५ बालके अनाथ झाली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत हा आकडा वाढून सुमारे १५४९ इतका झाला आहे. यात एक पालक गमावलेले १४९० आणि दोन्ही पालक गमावलेल्या ५९ मुलांचा समावेश आहे. कोरोना लहान मुलांना किती अनाथ करीत आहे, हे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या बालकांची जबाबदारी महिला व बालविकास खात्यातर्फे घेतली जाणार अाहे. सगळ्यात जास्त अनाथ झालेल्या मुलांची संख्या नागपूर विभागात ५५४ इतकी आहे. यात एकल पालक गमावलेले ५४३ आणि दोन्ही पालक गमवावे लागल्याने अनाथ झालेली ११ मुले आहेत. हे आकडे आणखी वाढू शकतात, असे यशोमती ठाकूर यांनी यापूर्वी सांगितले होते. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा स्तरावर कृतिदल स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यभरातील महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ चा फलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच अधिसूचना काढल्यामुळे नागपूर महापालिका क्षेत्रात २५ रुग्णालयांबाहेर हेल्पलाइन क्रमांक लावल्याची माहिती चाइल्डलाइनच्या समन्वयक रूपा वरदान यांनी दिली. कोरोनामुळे कामाला अपेक्षित गती नसली तरी शक्य तितक्या लवकर सर्व रुग्णालयांबाहेर चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक लावू, असे त्यांनी सांगितले.

एकल, दोन्ही पालक गमावलेल्यांची संख्या
िवभाग एकल दोन्ही
कोकण ५१ १२
पुणे १४७ ०७
नाशिक २९७ २०
अमरावती १३० ०८
नागपूर ५४३ ११
औरंगाबाद २२३ ०१

बातम्या आणखी आहेत...