आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खर्चाचा तपशील:मुख्यमंत्री सहायता निधीत 541 कोटी रुपयांचा निधी जमा, पैकी फक्त 132 कोटीच केले खर्च; आरटीआय उत्तरातील माहितीत स्पष्ट

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलला 20 कोटी, रत्नागिरी आणि जालना जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी 1.07 कोटी दिले

कोरोना मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल ५४१ कोटी रुपयांचा निधी जमा झाला. मात्र, ऑगस्टच्या ३ तारखेपर्यंत त्यातील केवळ १३२ कोटी रुपये खर्च झाल्याचे आरटीआय उत्तरातील माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज करून माहिती मागवली होती. सीएमअोतील कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद कापडी यांनी अर्जाला उत्तर देत मुख्यमंत्री निधीला मिळालेल्या निधीचा सविस्तर तपशील दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणाऱ्यांची नावे द्यावीत, अशी मागणीही कोलारकर यांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत देणगीदारांची नावे देण्यास नकार देण्यात आला आहे. शिवाय, सरकारकडून मिळालेल्या माहितीमध्ये देणगीदारांची नावे नाहीत. केवळ धनादेशाचे क्रमांक आहेत. त्यावरून नावे शोधून काढणे खूपच जिकिरीचे काम आहे, असे मिलिंद कापडी यांनी स्पष्ट केले आहे.

निधीतून यांना मिळाली मदत...

५४१ कोटींपैकी १३२.३ कोटी रुपये खर्च झाले. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलला २० कोटी, रत्नागिरी आणि जालना जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी १.०७ कोटी रुपये देण्यात आले. जालना येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यू पावलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना ८ कोटींची मदत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.