आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीविषयक कार्य:कुलकर्णी यांना पक्षिमित्र जीवनगौरव पुरस्कार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’तर्फे देण्यात येणाऱ्या २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्व. रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवनगौरव पुरस्कार पक्षी संवर्धन व जनजागृतीसाठी कार्यरत पक्षिमित्र, चळवळीतील मार्गदर्शक, ज्येष्ठ सभासद तथा पक्षीविषयक पुस्तकांचे लेखक, माळढोक पक्ष्याचे अभ्यासक सोलापूर येथील भीमाशंकर शा. कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.

इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार नांदेड येथील प्रा. डॉ. जयवर्धन विठ्ठलराव बलखंडे यांना, पक्षी संवर्धन व सुश्रूषा पुरस्कार सोलापूर येथील राजकुमार जगदीश कोळी यांना, तर पक्षी जनजागृती पुरस्कार गडहिंग्लज येथील अनंत बाबू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

पक्षीसंबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. या पुरस्कारांचे वितरण चंद्रपूर येथे होणाऱ्या ३५ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...