आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाऱ्यात दिवाळी हंगामा कार्यक्रमात राडा:हुल्लडबाजाकडून पंचायत समिती उपसभापतींसह चौघांना जबर मारहाण

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी हंगामा कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांकडून आयोजकांना मारहाण करण्यात आली आहे. तरुणांना समजावयाला गेलेल्या भंडारा पंचायत समितीच्या उपसभापतीसह चार आयोजकांना तरुणांनी लाठ्याकाठ्यानी जबर मारहाण केल्याची घटना भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात मध्यरात्री घडली आहे.

जखमींवर भंडारा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पाच तरुणावर कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सर्वांना अटक करण्यात आली आहे. आशिष पडोळे (25), कमलाकर अहिर (42), निखिल पाणबुडे (28), अक्षय साखरवाडे (25) यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा "हंगामा कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्यरात्री तिथे कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे व इतर चार लोक गेले असता यावरुन दोन गटात सुरुवातीला शाब्दिक वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही गटात राडा होऊन तरुणांनी मोठ्या लाठ्याकाठ्यानी मारहाण सुरु केली.

यात प्रशांत खोब्रागडे (52) यांच्यासह राजेंद्र साखरवाडे (34), प्रशांत माकडे (27), 12 वर्षीय आदेश देशमुख या चौघांना जबर मारहाण झाली. लागलीच जखमीना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी प्रशांत खोब्रागडे यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी आशिष पडोळे (25), कमलाकर अहिर (42), निखिल पाणबुडे (28), अक्षय साखरवाडे (25) यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...