आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण:बदली केल्यामुळेच परमबीर यांचे खोटेनाटे आरोप

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन वाझे व परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर चुका माफ करण्यालायक नव्हत्या

परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप समोर येत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे अारोप केले, असे देशमुख म्हणाले.

सचिन वाझे व परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर चुका माफ करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचा तपास एनआयए करत आहे. म्हणून मी त्यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भात मी जाहीर वक्तव्य सुद्धा केले होते. त्याच्या रागापोटी त्यांची बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एक सुद्धा आरोप नाही. परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...