आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वेळा निवडून आलो, मात्र स्थगिती सरकार पाहिले नाही:सरकारने आघाडीच्या कामांना स्थगिती दिल्याने पवार आक्रमक

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने मागील सरकारच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृह ११.३० वाजता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब केले.

आम्ही सात सात वेळा निवडून आलो. अनेक सरकारे पाहिली. पण असे स्थगिती सरकार पाहिले नाही असा आरोप पवार यांनी केला. व्हाईट बुकमध्ये आलेल्या कामांनाही स्थगिती देण्यात आली हे चांगले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच कामांना स्थगिती दिली नसल्याचे सांगितले. तुम्ही सात वेळा निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलाे. पण आम्ही तुमच्याकडूनच हे शिकलो, असा टोला फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात भाजपच्या लोकांना एक पैसा दिला नाही. अनेक चांगल्या कामांना स्थगिती देण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही ७० टक्के स्थगिती उठवली असून फक्त ३० टक्के स्थगिती कायम आहे. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या असे चालणार नाही. यादरम्यान विरोधकांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...