आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:अटकेतील नक्षल समर्थकांना आठ ऑगस्टपर्यंत पीसीआर

गडचिरोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन नक्षल समर्थकांना शहीद सप्ताहानिमित्त नक्षली बॅनर लावताना पोलिसांनी अटक केली होती.

तिन्ही आरोपींना शुक्रवारी अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पीसीआर दिला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन उईकेसह प्रफुल्ल भट व अनिल भट यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...