आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही सावित्रीच्या लेकी आहाेत, काेणाच्या हातातील बाहुल्या आहाेत का? आपल्या स्वत:च्या धर्मात लग्न करून किती बायका खऱ्या अर्थाने सुखी आहेत? धर्म आणि स्त्रिया असा संंबंध लावून हे लोक भांडवल करत आहेत. ‘बाई, तुझा धर्म काेणता?’ हे विचारले जाते. एकदाचे ठरवून तरी टाका बाईचा धर्म. आपल्याकडे एक परधर्मीय माणूस बाईचा फक्त उपभाेगच घेणार असे या लाेकांना का वाटते? असा खडा सवाल अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक रसिका आगाशे - अयुब यांनी केला.
वर्ध्यातील ९६ व्या साहित्य संमेलनाला विराेध म्हणून विद्राेही सांस्कृतिक चळवळ आयाेजित १७ व्या विद्राेही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री रसिका यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या म्हणाल्या की, मी आगाशे असून मुसलमान मुलाशी लग्न केले. मात्र २०१४ पर्यंत मला काेणीही त्याबद्दल विचारले नाही. आता मात्र जाे उठेल ताे विचारताे. साेशल मीडियावर कमेंट येतात की, मग काय लव्ह जिहाद का? घरवापसी का? खरं तर स्पेशल मॅरेज अॅक्टबद्दल काेणाला काहीच माहिती नाही.
मी भारतीय व्यवस्थेबद्दल बाेलते तर माझ्याकडे बाेट दाखवले जाते. मग काय मी पाकिस्तानबद्दल बाेलू का? आज हे लाेक आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भातील बिल पास करायला निघाले आहेत. उद्या हे धाडस आंतरजातीयपर्यंत येईल. तेव्हा आपण आतापासूनच बाेललाे पाहिजे. नाहीतर यांचे हे निर्णय आपल्यावर लादले जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी नागरिकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.