आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर आता अवघ्या 5 तासांवर येणार आहे.
नागपूरपासून सुरू होणारा हा महामार्ग मुंबईपर्यंत 12 जिल्ह्यांतून जाणार आहे आणि अप्रत्यक्षपणे जोडले जाणारे 12 जिल्हे असे 24 जिल्हे आणि 5 महसुली विभाग या महामार्गाने जोडले जातील. शिर्डीपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पाहुयात नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या या मार्गाचे नयमरम्य फोटोज...
1) नागपूरमधील समृद्धी महामार्गाचा ग्रँड एंट्री पॉईंट
2) अरवी पुलगाव इंटरजेंच (जिल्हा - वर्धा)
3) बो स्ट्रिंग ब्रिज (वर्धा)
4) सिंधी ड्रायपोर्ट इंटरचेंट (वर्धा)
5) कांरजा-सोहोळ इंटरजेंच
वन्यजीवांच्या अधिवासात अडथळा नाही
समृद्धी महामार्गात पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य दिले गेले आहे. हा महामार्ग कारंजा-सोहोळ, काटेपूर्णा आणि तानसा या तीन अभयारण्यातून जातो. तो ज्या अभयारण्याजवळून जातो तेथील महामार्गाची रुंदी ९० मीटर केली आहे. तसेच वन्यजीवांच्या अधिवासात महामार्ग हा अडथळा ठरू नये, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा अंडरपास आणि ओव्हरपासची उभारणी केली आहे. याशिवाय, महामार्गावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. या महामार्गावर ३३ लाख झाडे लावली जाणार आहेत. ‘बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया’ने सुचवल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या पर्यावरणाला अनुकूल झाडे लावली जाणार आहेत.
6) वाईल्टलाईफ पासिंग (वाशिम)
7) वाईल्डलाईफ ओव्हर पासिंग (औरंगाबाद)
8) तांदुळवाडी पुल (जालना)
9) औरंगाबाद
9) एक्सप्रेस वे व्ह्यु (औरंगाबाद)
10) मुख्य पूल (वर्धा)
11) सेलू बाजार एंटरचेंज (वाशिम)
महामार्गाजवळ नवनगर
समृद्धी महामार्ग 392 गावांना जोडणार आहे. तो ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंज तयार केले जात आहेत. 24 पैकी 19 इंटरचेंजच्या जवळ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करून त्याचे रूपांतर नवनगरात होईल. शेतीपूरक उद्योग तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही राखीव भूखंडांसह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मोकळे रस्ते, निवासी इमारती आदी सुविधा या नवनगरांमध्ये असतील.
संबंधित बातम्या...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.