आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना दिलेल्या नोटीसवर काँग्रेसजन घालत असलेल्या गोंधळावरून केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर सडकून टीका केली. ''अनेकदा काहीतरी बोलून चर्चेत राहणे ही काही लोकांची सवय झाली आहे, परंतु त्यांना हा मुद्दा किती गंभीर आहे हे समजत नाही'' असा टोला लगावला.
राहुल गांधी महिलांबाबत गंभीर असतील तर त्यांनी माहिती द्यावी. ते काय लपवत आहे. खासदार असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा ते खोटे बोलत होते की आता खोटे बोलत आहे? असा सवालही ठाकुर यांनी केला.
राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. आजही महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी केले होते. त्यावर त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर बोलताना अनुराग ठाकुर यांनी सडकून टीका केली.
ओटीटी प्लॅटफार्मवर मोठ्या प्रमाणात शिव्यांचा भडीमार आणि अश्लीलता दाखविली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ओटीटी प्लॅटफार्म हे कलाकारांच्या सृजनशीलतेच्या स्वातंत्र्यासाठी आहे, अश्लीलता पसरविण्यासाठी नव्हे असे स्पष्ट मत ठाकूर यांनी व्यक्त केले. यासंदर्भात आलेल्या तक्रारींवर मंत्रालयाद्वारे गंभीर दखल घेतली जाईल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात देशात जलदगतीने रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. यासोबत वंदे भारत रेल्वेचा अनुभव तर अतुलनीय आहे. याशिवाय खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत थॉमस क्लब, कॉमन वेल्थ, ऑलम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंनी अनेक पदक पटकाविले आहे. खेलो इंडियामुळे खेळाडूंच्या चमकदार कामगिरींमध्येही वाढ झाली आहे.
खेलो इंडियाचे १ हजार केंद्र
देशामध्ये खेलो इंडियाचे १ हजार केंद्र सुरू केले जाणार असून त्यापैकी ९३५ केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत १ हजार केंद्राचे लक्ष्य पूर्ण केले जाईल असेही अनुराग ठाकूर यांनी आवर्जुन सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.