आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीएम-एसटीआयएसीचे क्वांटम फ्रंटियर मिशन हे मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या प्रमाणात समकालीन आव्हानांपैकी एक म्हणून क्वांटम यांत्रिक प्रणाली समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी काम सुरू करणे आहे. या मिशनचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून लवकरच केंद्र सरकारकडून याची घोषणा केली जाईल अशी माहिती पंतप्रधानांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार अजय सूद यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
या मिशनमार्फत क्वांटम फ्रंटियरमध्ये उत्कृष्टता निर्माण करणे राष्ट्रीय सुरक्षा आणि क्वांटम कॉम्प्युटर्स, क्वांटम केमिस्ट्री, क्वांटम कम्युनिकेशन, नवीन सामग्री, क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफीच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार आहे.
क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सिम्युलेशन, क्वांटम कॉम्प्युटेशन आणि क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी हे क्वांटम तंत्रज्ञानाचे चार डोमेन आहे. ५० वर्षांपूर्वी आपण सेमी कंडक्टरची संधी गमावली. तशी आता क्वांटम मिशनची संधी गमवायची नाही.
क्वांटम तंत्रज्ञान खूप सुरक्षित असल्याची ग्वाही सूद यांनी दिली. व्यापक ॲप्लिकेशन्ससह संगणन, संवाद आणि सायबर सुरक्षेमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे, असे सूद यांनी सांगितले.
जीएम पीकांबाबतची ओरड आणि विरोध अनाठायी आहे. बहुतांश वेळा जीएम पिकांना भीतीपोटी आणि भावनिक विरोध केला जातो. आज आपण आयात करीत असलेले खाद्य तेल जीएम पिकांपासून तयार झालेले आहे. पण ते खाऊन कोणतीही बाधा झालेली नाही याकडे सूद यांनी लक्ष वेधले.
आकडेवारीचे बळी पडू नका
अनेक वेगवेगळ्या अहवालांतून भारताचा क्रमांक घसरल्याचे किंवा निर्देशांकांत भारत खूप माघारल्याची आकडेवारी दिली जाते. मात्र ही आकडेवारी वस्तुस्थितीवर आधारित नसते. अशा आकडेवारीला बळी पडू नका असे आवाहन सूद यांनी केले. प्रत्येक जागतिक संस्थेचे निकष आणि मापदंड वेगवेगळे असतात. त्यामुळे असे अहवाल वस्तुस्थितीवर आधारित असतीलच असे नाही. म्हणून त्यातील आकडेवारीला फसू नका असे सूद यांनी स्पष्ट केले.
संशोधनाचा लाभ विद्यापीठांमार्फत ग्रामीण भागात पोहोचतो. मध्यंतरीच्या काळात अनेक विद्यापीठे या साखळीतून गळली होती. परंतु आता नॅशनल रिसर्च फाऊंडेशन विद्यापीठ स्तरावरील संशोधनाला प्रोत्साहन देत आहे. आपण विज्ञान तंत्रज्ञानासह कोणत्याच प्रगतीत माघारलेलो नाही. सुरूवातीला चढ खूप असल्याने प्रगतीचा वेग कमी होता. परंतु आता प्रगतीचा टप्पा गाठला आहे. आणखी बरीच मजल गाठायची आहे असे सूद म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.