आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू

गडचिरोली / रमेश बहिरेवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश बहिरेवार वय ४३ हे गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील रहिवासी असून मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना ९ डिसेंबर रोजी सकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. याची माहिती मिळताच ठाणेदार अशोक भापकर यांनी रमेश बहिरेवार यांना उपचारासाठी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून पुढील उपचारासाठी रेफर केले. पोलीस निरीक्षक गणेश कड आणि इतर कर्मचारी त्यांना त्वरित गडचिरोली येथे हलवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र त्यांच्या वेदना पाहून ठाणेदार अशोक भापकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी केला. त्यांनी लगेच जिल्हा पोलीस दलासाठी असलेला चॉपर मुलचेराला पाठवण्याचा निर्णय घेतला. नंतर नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. दरम्यान, तिसऱ्या दिवशी रमेश बहिरेवार यांचा मत्यू झाला. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...