आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढता आहे. असे चित्र असताना नागपूर येथील अजनी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची यादी चेक करत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेली वाहने जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची कामगिरी
अजनी पोलिस मंगळवारी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची यादी चेक करीत असताना फुलमती लेआऊट, लोहार समाज भवनाजवळ एक जण धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असता त्याने त्याचे नाव सायमन उर्फ शेट्टी अॅन्थोनी फ्रान्सीस (वय 22) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळू हत्तीमार चाकू सापडला. त्याच्याविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात भादंवी कलम 348 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहने भंगारवाल्यांना विकायचा
गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायमन उर्फ शेट्टी अॅन्थोनी फ्रान्सीस हा सराईत वाहन चोर असून त्याला पळून जाण्याची सवय असल्याचे समोर आले. त्याने अजनी हद्दीत सात ठिकाणी वाहन चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली वाहने मो. वकील अंसारी मो. गौस अंसारी (वय 52, मोमीनपुरा) या भंगारवाल्याला विकल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या जवळून 1 लाख 44 हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
काळजी घेण्याचे आवाहन
अनेकदा वाहन चालक हॅण्डल लाॅक न करताच वाहन सोडून निघून जातात. अनेक प्रकरणांत वाहन चालक चावी वाहनालाच सोडून गेल्याचे लक्षात आले. हे चोराला आमंत्रण देणेच आहे. तेव्हा वाहन चालकांनी कुठेही जाताना हॅण्डल लाॅक करावे तसेच चावी गाडीला विसरुन जाऊ नये, असे आवाहन अजनी पोलिसांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.