आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दक्ष:नागपूरमध्ये सायबर फसवणूक टाळण्याचे नागरिकांना धडे; लाइव्ह डेमोतून जनजागृती

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर पोलिस दक्ष झाले असून, त्यांनी सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना लाइव्ह डेमो दाखवून शनिवारी धडे दिले. लेडीज क्लब चौकातील पोलिस भवन येथे पोलिसांच्या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हा अनोखा प्रयोग करण्यात आला. हे प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी खुले असून, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

आशावादी राहण्याचे आवाहन

प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. यावेळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी "आशाए मेरे दिलकी' हे गाणे गाऊन आशावादी राहाण्याचे आवाहन केले. तर दत्ता खंडारे यांनी सॅक्सोफोनवर आरडी बर्मन यांची गाणी वाजवून रंगत वाढवली. प्रदर्शनामध्ये आरमार शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, महिला तक्रार निवारण कक्ष, वायरलेस विभाग, बाँब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, क्विक रिस्पाँस टिम, आदी विभागांचे स्टॉल लावून माहिती देण्यात येत होती.

शस्त्रांची दिली माहिती

प्रदर्शनाला सर्वसामान्यांनी भेट दिली. यावेळी त्यांना पोलिसांच्या शस्त्रांची माहिती देण्यात आली. शस्त्र प्रदर्शनात साध्या भरमार बंदुकांपासून आधुनिक ए. के. 47 पर्यत आणि गावठी तमचापासून अत्याधुनिक पिस्टलपर्यतची शस्त्रे ठेवण्यात आली होती. तसेच बाँब शोधक आणि नाशक पथकाच्या श्वानाने हँडलरने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे केलेले पालन पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.

म

फसवणुकीचे लाइव्ह डेमो

पोलिस बँडवर आठवणीतील संस्मरणीय गाण्यांच्या धून वाजवल्या. फसवणूक करणारे कशी फसवणूक करतात याचे लाइव्ह डेमो सायबर सुरक्षा सेलने दिली. एनडीपीएस अंतर्गत विविध मादक द्रव्यांची माहिती देण्यात आली. प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सेल्फी पाॅइंटवर अनेकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

बातम्या आणखी आहेत...