आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:पीओपी मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही : नागपूर खंडपीठ; एक वस्तू म्हणूनच पीओपी मूर्तींची विक्री करता येईल

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री मूर्ती म्हणून नाही, तर एक वस्तू म्हणून करता येईल. मात्र, ग्राहकांनी अशा मूर्तींची पूजा करू नये. तसेच “पीओपी’च्या मूर्तींचे कुठेही विसर्जन करता येणार नाही,’ असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी मूर्तिकारांची याचिका फेटाळून लावली.

पर्यावरणाला हानिकारक असल्याच्या कारणावरून केंद्र व राज्य सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. याचअंतर्गत नागपूर मनपानेही “पीओपी’च्या मूर्तींची विक्री तसेच साठवणूक करण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाविरुद्ध विनोदकुमार गुप्ता आणि श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशनने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मूर्तिकारांकडील “पीओपी’च्या मूर्तींच्या साठ्याची विक्री करू द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली.

“पीओपी मूर्तींवर बंदी अचानक लावण्यात आलेली नाही. हा निर्णय २०१२ पासून लागू आहे. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे म्हणता येणार नाही. याउपरही मूर्तिकारांचे आर्थिक हित जपण्यासाठी म्हणून घालून दिलेल्या अटींवर विक्री करण्याची मुभा देता येईल,’ असे न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने नमूद केले. मूर्तींच्या सरसकट विक्रीची मागणी मात्र खंडपीठाने फेटाळली.

बातम्या आणखी आहेत...