आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:खादीचा वापर करून अवघ्या 250 रुपयांत पीपीई किट, गांधींच्या सेवाग्राममध्ये आत्मनिर्भरतेचे पहिले पाऊल

नागपूर (अतुल पेठकर)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 वेळा धुऊन पुनर्वापर शक्य, उष्णतेच्या त्रासातून सुटका
Advertisement
Advertisement

कोरोना उपचारांसाठी डॉक्टर, परिचारिकांसाठी पीपीई किट गाऊन वर्धा येथील प्रो. डॉ. राहुल नारंंग यांनी खादीचा वापर करून अवघ्या २५० रुपयांमध्ये बनवला अाहे. बाजारात किमान १२०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या पीपीई किटच्या तुलनेत खादीचा हा गाऊन वापरण्यासही सोयीचा असून किमान २० वेळा धुऊन त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कोरोनाचे अभूतपूर्व संकट असल्याने आपल्याला व्यवसाय करायचा नसल्याने हे संशोधन सर्वांसाठी खुले ठेवले असल्याचे डॉ. नारंग यांनी सांगितले.

डॉ. नारंग हे वर्धा येथील सेवाग्राम शासकीय वैद्यकीय मायक्रोबायोलॉजी विभागात प्रोफेसर आहेत. त्यांना पीपीई किट गाऊनविषयी नागपूर येथील मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांसह अनेक खासगी रुग्णालयांकडून विचारणा आली. परंतु, आपापल्या गरजेनुसार प्रत्येकाने पीपीई किट तयार करावा असे सांगून सुरत येथील अजय टेक इंडिया कंपनीत १०० रुपये मीटरप्रमाणे हे कापड मिळते, असे डाॅ. नारंग म्हणाले.

उष्णतेसोबतच इतरही अडचणी : 

डॉक्टर व परिचारिकांना पीपीई किट घालून काम करावे लागते. एक पीपीई किट १० ते १२ तास वापरल्यानंतर सरळ फेकून द्यावे लागते. एका पीपीई किटसाठी १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. दिवसेंदिवस पीपीई किटची मागणी वाढतेच आहे. घातक कचरा म्हणून त्याचे व्यवस्थापनसुद्धा करावे लागते. हे किट घातल्यानंतर पाणी पिणेही शक्य नसते. असे किट ड्यूटी केल्यानंतर उष्णतेमुळे डॉक्टर्स आणि चाचणी करणाऱ्या तज्ञांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

खास गुजरातहून मागवले कापड

डाॅ. नारंग यांनी थेट डीआरडीओमध्ये संपर्क करून वारंवार धुऊन आणि निर्जंतुकीकरण करून वापरता येईल असे कापड उपलब्ध असल्याची खात्री करून घेतली. गुजरातहून हे खास कापड मागवून त्याच्या विविध चाचण्या करून घेतल्या. नंतर आपल्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिनेन विभागाकडून विशेष गाऊनच्या स्वरूपात पीपीई किट गाऊन शिवून घेतला. हा विशेष किट २० वेळा धुऊन वापरता येतो. शिवाय गाऊनच्या स्वरूपात असल्याने त्यात हवा खेळती राहते.

खादीमुळे दूर झाला उष्णतेचा त्रास

मुद्दा होता उष्णतेचा. यासाठी खादी मदतीला धावून आली. खादीची साधी बंडी घालून त्यावर हे किट घातल्यास घाम शोषला जाऊन गरमीचा त्रास कमी झाला. याहीपुढचा उपाय म्हणून त्यांनी खादीच्या या बंडीला ४ मोठे खिसे शिवून घेतले. आणि त्या खिशांमध्ये प्रयोगशाळेत वापरतात ते “फेस चेंज मटेरियल’ (पी.सी.एम.) फ्रिजमध्ये गार करून ठेवणे सुरू केले. पीसीएम कित्येक तास थंड राहू शकते. याचा गारवा खादीच्या बंडीतून सतत प्राप्त होत राहतो आणि पीपीई किट्सच्या उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते.

Advertisement
0