आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताचा कर्करोग:प्रकाश आमटे यांना रक्ताचा कर्करोग; पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार, सोबतच न्यूमोनियाचाही

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजसेवक प्रकाश आमटे यांना दुर्मिळ हेअरी सेल ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमटे यांना कर्करोगासोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांपासून खूप ताप असून पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमटेंना आरामाची गरज असल्याने चाहत्यांनी फोन न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे. प्रथम त्यांच्या न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. दोन किंवा तीन आठवड्यांनंतर शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो. केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती करते. एरवी या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतूंशी लढतात. पण अतिरिक्त निर्मितीमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेत त्या तारकऐवजी मारक ठरतात. या पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.

ही आहेत या दुर्मिळ आजाराची लक्षणे
सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, धाप लागणे, जास्त घाम येणे, सुजलेल्या लिम्फ नोड्स, वारंवार संक्रमण आणि ताप, त्वचेवर लहान लाल ठिपके, वाढलेले यकृत किंवा प्लिहा, जखम आणि रक्तस्राव, हाडांचे दुखणे, विशेषत: बरगड्यांखाली दुखते.

बातम्या आणखी आहेत...