आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची लागण:प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण, नागपुरातील खासगी रूग्णालयात हलवले

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना गुरूवारी सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

मागील सात दिवसांपासून आमटे यांना ताप व खोकला होता. बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट केली असता निगेटीव्ह आली. त्या नंतर औषधे घेऊनही ताप व खोकला कमी होत नव्हता. म्हणून चंद्रपूर येथे तपासणी केली असता कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. सीटी स्कॅन तसेच ब्लड चेकअपमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे. कोरोनाने राज्यात परत हातपाय पसरल्याने हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पासह आनंदवन तसेच सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद ठेवण्यात येत असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...