आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Preparing  Bappa's Farewell In Nagpur| Arrangement Of 304 Artificial Tanks At 204 Locations In 10 Zones | 4 Feet Murti's In Korodi Lake

नागपुरात बाप्पाच्या निरोपाची तयारी:10 झोनमध्ये 204 ठिकाणी 304 कृत्रिम टँकची व्यवस्था, 4 फुटांवरील मूर्त्या कोरोडी तलावात

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

9 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. गणेश विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 विविध ठिकाणी 390 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे वेब लिंक जारी करण्यात आली आहे. मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या लिंकवर जाऊन नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

चौकाचौकात कृत्रिम तलाव

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध 204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच 4 फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत.

निर्माल्य कलशाची व्यवस्था

शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत. जागोजागी निर्माल्य कलशाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.

एअरफोर्सची उपस्थिती

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या विसर्जनस्थळी उपस्थित राहाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव येथील एअरफोर्स बाजूने उपस्थित राहणार आहेत. तसेच सक्करदरा तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलाव परिसरात निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत.

कोराडी कृत्रिम तलाव

गणेश विसर्जन संदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच बैठक घेतली. 4 फूटाखालील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये तसेच 4 फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी होईल.

बातम्या आणखी आहेत...