आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सुमारे १० जिल्हे आणि २६ तालुक्यांतून गेलेल्या तसेच ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या ५२० किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धीवरून प्रवासासाठी प्रतिकिमी १.७२ रुपये दराने टोलची आकारणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समृद्धीवरून वन-वे १५ किमी प्रवास करणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी "दिव्य मराठी'ला दिली.
टोल एकूण : २५ पहिल्या टप्प्यात : २० १ किमीला १ रु. ७२ पैसे वैशिष्ट्ये : २५ टोलपैकी मुख्य रस्त्यावर फक्त दोनच टोल राहतील. उदाहरणार्थ नागपूर ते मुंबईदरम्यान एक
इतर टोल : मुख्य मार्गावरून ज्या गावातून बाहेर पडायचे त्या गावाच्या एक्झिट पॉइंटला टोल असेल. अमरावती, बुलडाणा, जालना औरंगाबाद, नाशिक, ठाणे आदी शहरे समृद्धीपासून या गावांचे अंतर असलेल्या इंटरचेंजपासून जोडली जातील. उदाहरणार्थ : अमरावतीच्या जवळचा इंटरचेंज शिवणी येथून अमरावती जोडले जाईल. प्रत्येक शहराचे अंतर साधारणत: ३० ते ५० किलोमीटर इतके आहे.
दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या जुलैपर्यंत शक्य एकूण १८० किमी शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याचे ८० टक्के संपलेले आहे. आता जुलै २०२३ मध्ये हा मार्गही पूर्णत्वास येऊ शकतो. जालना ते नांदेड या तिसऱ्या टप्प्यातील रस्त्यासाठीचे भूसंपादन मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.