आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’:6 ते 8 जानेवारी दरम्यान पंतप्रधानांच्या संकल्पनेतील कार्यक्रमाचे आयोजन

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’चे नागपुरात आयोजन करण्यात येत आहे. सिद्धिविनायक ट्रस्ट झिल्पीद्वारे 6, 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानात हे एक्स्पो आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवारी 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’चे उदघाटन होईल. उदघाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माहिती आयुक्त राहुल पांडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती असेल, अशी माहिती माजी महापौर तसेच सिध्दीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.

उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार

तीनही दिवस दुपारी 12 ते रात्री 10 वाजता पर्यंत नियमित हे एक्स्पो सुरू राहिल. विशेष म्हणजे, एक्स्पोमध्ये सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा, सुप्रसिद्ध गायक अजित परब आणि विक्रमवीर विष्णू मनोहर यांचे विशेष शो असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक रोजगार आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि विदेशात या उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने ‘व्होकल फॉर लोकल’ ही संकल्पना मांडली.

स्वयंरोजगाराला प्रोत्साहन

पंतप्रधानांच्या या संकल्पनेत आपले छोटेशे योगदान म्हणून आणि नागपूर शहरात स्थानिक स्तरावर येथील महिला, तरुण यांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे, या हेतून ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांचे आयोजन

एक्स्पोमध्ये पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानात शुक्रवारी ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांची भजन संध्या, शनिवार 7 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे..’ फेम सुप्रसिद्ध गायक अजित परब यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ख्यातनाम शेफ विक्रमवीर विष्णू मनोहर यांच्या कुकरी शो चे आयोजन केले आहे.

भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षीसे

याशिवाय ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’मध्ये ‘फॅशन अँड लाईफस्टाईल’, ज्वेलरी, हस्तकला आणि हस्त निर्मिती दागिने, सर्व प्रकारची सेंद्रीय उत्पादने, नर्सरी अँड ॲग्रो, स्किल डेव्हलपमेंट अँड ट्यूटोरियल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स/रिअल इस्टेट, बँकींग अँड म्यूचल फंड, अन्नपदार्थ अनेक विविध स्टॉल्स असणार आहे. विशेष म्हणजे, या एक्स्पो ला भेट देणाऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉ काढले जाणार आहे. या लकी ड्रॉच्या माध्यमातून एक्स्पोला भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षीसे सुद्धा जिंकता येणार आहेत. एक्स्पोला समस्त नागपूरकरांनी अवश्य भेट द्यावी आणि आनंद लुटावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...