आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:लग्नाचे आमिष दाखवून कैद्याच्या पत्नीवर बलात्कार

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुनाच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. दिघोरी येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने गणेश पेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन डाॅ. गौरव रमेश डोर्लीकर (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, पीडित महिलाचा पती खुनाच्या आरोपात २०१३ पासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिला दोन मुले असून, उदरनिर्वाहासाठी ती क्युनेट बिझनेस करते. तिच्या एका नातेवाइकामार्फत तिची आरोपी डाॅ. डोर्लीकरशी ओळख झाली. त्याने आपण पत्नीपासून वेगळे होणार असल्याचे सांगितले. तसेच पीडिताला तिच्या पती विरुद्ध घटस्फोट घेण्यासाठी अर्ज करायला लावला. तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. त्यानंतर लग्नासाठी नकार दिला. अखेर पीडिताने पोलिसात फिर्याद दिली. डॉ. डोर्लीकरविरुद्ध ३७६ (२), (एन) नुसार गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...