आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश, गडचिरोली पोलिसांची कामगिरी

गडचिरोली (हेमंत डोर्लीकर)6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षलवाद्यांना मोठया प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चार आरोपींना अटक अटक करण्यात आली आहे.

गोपनिय माहितीच्या आधारे जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलिस स्टेशन हद्दीतील भंगारामपेठा गावात उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोलिस स्टेशनचे जवान व शीघ्र कृती दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. यावेळी काही इसम तेलंगणामधुन दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे नक्षलवाद्यांना काही साहित्य पोहोचवण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. यावेळी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यांच्याकडून 10 कार्डेक्स वायरचे 3500 मीटर लांबीचे बंडल व इतर नक्षल साहित्य जप्त केले.

नक्षलवादयांना सदरचे साहीत्य पुरवठा करणाऱ्यांमधील राजु गोपाल सल्ला (वय 31 वर्षे), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय 24 वर्षे), साधु लच्चा तलांडी (वय 39 वर्षे), मोहम्मद कासिम शादुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. तर छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे हा फरार झाला आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलिस दलाकडुन कसुन तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, समीर शेख, जिमलगट्टाचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...