आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्यक्ती, एक पद:शिर्डी येथील शिबिरात नागपूरचे काँग्रेस शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांचे राजीनामे; नाना चर्चांना उधाण

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"एक व्यक्ती, एक पद" या ठरावानुसार काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहे. यात राजेंद्र मुळक यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. पण, मुळक यांच्याकडे दुसरे कोणतेही पद नसताना त्यांनी राजीनामा का दिला हा चर्चेचा विषय आहे. शिर्डी येथे सुरू असलेल्या शिबिरात या दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.

काँग्रेसच्या शिबिरात ठरल्या प्रमाणे काहीच होत नाही. या शिबिरातील ठरावांना काही अर्थ राहात नाही. अशी तोफ डागीत माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. इम्रान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून देशमुख यांनी हा राजीनामा दिला होता.

आमदार व शहराध्यक्ष असलेले विकास ठाकरे हे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे खास विश्वासातील आहेत. सध्या शहर काँग्रेसवर मुत्तेमवार गटाचे वर्चस्व होते. नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांचा तसेच विलास मुत्तेमवार यांचा गट आहे. गटात विभागलेली काँग्रेस नेहमी गटबाजीत राहाते. विकास ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदावर कोणत्या गटाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे. नितीन राऊत यांचा गट यासाठी लाॅबिंग करीत असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...