आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नतीतील आरक्षण:या आरक्षणावर तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी : देवेंद्र फडणवीस; भंडाऱ्यात म्यूकरमायकोसिस उपचारासाठी प्रयत्न करणार

भंडारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड वाॅर्डाची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पीपणाची राहिली असून त्यांचा सामाजिक न्याय बोलण्यासाठी वेगळा आहे आणि कृतीमध्ये वेगळा आहे. सत्ताधारी हे सर्व काही ठरवून करतात, एकाने असे वागायचे आणि दुसऱ्याने तसे वागायचे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. या भूमिकेवर फडणवीस यांना प्रश्न केला असता ते माध्यमांशी बोलत होते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वाॅर्डाची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

जानेवारी महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल शिशू केअर युनिटमध्ये अग्नितांडव झाले होते. यात दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेला पाच महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही अद्यापही रुग्णालयात फायर सेफ्टीची व्यवस्था कार्यान्वित केली नसल्याची नाराजी फडणवीसांनी व्यक्त केली.

भंडाऱ्यात म्यूकरमायकोसिस उपचारासाठी प्रयत्न करणार
म्यूकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया भंडारा येथे करण्याची सुविधा नसल्याने त्यांना नागपूरला पाठवावे लागते. यानंतर म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर भंडारा येथेच उपचार व शस्त्रक्रिया करता यावी, याचे प्रयत्न होणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...