आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकच्या होर्डींग तसेच पोस्टर विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन:24 तासात न काढल्यास फाडून टाकण्याचा इशारा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रविवारी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर आले. विमानतळातूत बाहेर निघण्याच्या मार्गावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होर्डीग लावण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने या विरोधात आंदोलन करीत नाराजी व्यक्त केली.

'सी कर्नाटका ए न्यू' असे कर्नाटक पर्यटन विभागाचे होर्डींग विमानतळावर लावले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंग यांची छायाचित्रे असलेल्या होर्डींगवर "अवर स्टेट मेनी प्राईड' असे घोषवाक्य लिहिलेले आहे. या होर्डींगमुळे नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन करीत कर्नाटक सरकारचा निषेध केला.

शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी नागपूर विमानतळ रस्त्यावरील हॉटेल प्राईडसमोर कर्नाटक सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध केला.

नितीन तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे शहरात आगमन होताच कर्नाटक सरकारने विमानतळावर लावलेल्या या होर्डिंग्समध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावर महाराष्ट्र सरकारला इशारा देऊन महाराष्ट्राचा अपमान करण्याचा गोरखधंदा दिसत आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही उदासीनता भाजपासोबतची सत्तेची तळमळ दर्शवते. पण त्याचे परिणाम काहीही झाले तरी महाराष्ट्राचा हा अपमान शिवसैनिक सहन करणार नाहीत. आतापर्यंत केवळ मोजकेच होर्डिंग्ज पाडण्यात आले आहेत, कर्नाटक सरकारचे होर्डिंग 24 तासांत हटवले नाही, तर शिवसैनिक स्वत:हून कर्नाटकातील होर्डिंग्ज फाडून टाकतील, असा इशारा तिवारी यांनी प्रशासनाला दिला.

या आंदोलनात शहरप्रमुख दीपक कापसे, जिल्हा संघटिका सुशीला नायक, शहर संघटिका मंगला गवरे, मुन्ना तिवारी, नीलिमा शास्त्री, प्रीतम कापसे, विशाल कोरके, अंकुश भोवते, गजानन चकोले, अब्बास अली, आशिष हादगे, सोनू शाहू, सलमान खान, दीपक शेकडो आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...