आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पासिंग आऊट परेडमध्ये युनिफॉर्म न दिल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांची निदर्शने

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सुरक्षा बल या महाराष्ट्र पोलिसांच्या युनिटच्या ७५० प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूरच्या प्रादेशिक पोलिस ट्रेनिंग सेंटरसमोर आंदोलन केले. ४५ दिवसांचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पासिंग आऊट परेडमध्ये युनिफॉर्म दिला नसल्याचा आरोप करत या प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले. साडेसातशे प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये याप्रमाणे ऑनलाइन पैसे घेण्यात आले होते. “पण ज्या टेलरकडे साडे सातशे युनिफॉर्म शिवायला दिले होते. त्यांनी ते वेळेत पूर्ण शिवून दिले नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पासिंग आउट परेडमध्ये गणवेश देण्यात आला नाही’ असे प्रादेशिक पोलिस ट्रेनिंग सेंटरच्या वतीने सांगण्यात आले. परंतु विना गणवेश पासिंग आऊट परेडमध्ये का पाठवले, गणवेश दिला नाही, तर अडीच हजार रुपये परत का दिले नाही, असा प्रश्न या आंदोलकांनी विचारला.

राज्यातून ठिकठिकाणच्या ग्रामीण भागातून शेतकरी, शेतमजूर आणि गरीब कुटुंबातले हे प्रशिक्षणार्थी कसेबसे करून नागपूर येथे ट्रेनिंगसाठी पोहोचले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिस ट्रेनिंग सेंटरसमोर आंदोलन केले. महाराष्ट्र सुरक्षा बलात ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये सुरक्षेसाठी या जवानांना तैनात करण्यात येते. ११ महिन्यांच्या बॉण्डवर त्यांना कॉन्ट्रॅक्टवर नोकरी देण्यात येते. प्रति महिना २५ हजार रुपये या जवानांना पगार मिळतो. परंतु पासिंग आऊट परेडमध्ये गणवेश न देताच परेड करावे लागल्यामुळे हे विद्यार्थी नाराज नाराज झाले.

बातम्या आणखी आहेत...