आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा परिणाम:नागपुरात आता लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यूची घोषणा, तुकाराम मुंढेंनी घेतला निर्णय

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात नागपूर शहरही मागे नाही. येथे रुग्ण वाढायला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीव शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 25 आणि 26 जुलै असे दोन दिवस हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

मनपा मुख्यालयामध्ये आज अधिकारी आणि नागपूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची आणि नेत्याची उपस्थिती आहे. बैठकीत सर्वांच्या संमतीने हा जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. आज शहरामध्ये दिवसभर जनता कर्फ्यू संदर्भात सर्वत्र जनजागृती केली जाणार आहे.

'उद्या-परवा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे, जनतेने हा कर्फ्यू पाळावा. लॉकडाउन करायची वेळ आली तर तो अत्यंत कडक असेल' असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. यासोबतच नागपूरमध्ये 31 तारखेला पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुंडेंनी सांगितले आहे.