आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींची पुस्तक विक्री आली हजारावर:वर्धा साहित्य संमेलनात अत्यल्प पुस्तक विक्रीमुळे प्रकाशक नाराज

अतुल पेठकर l राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील साहित्य संमेलनात पुस्तकांच्या दालनांकडे वाचक फिरकला नसल्याचे पाहून प्रकाशकांमधून नाराजीचा सूर निघाला. दालनासाठी प्रकाशक किंवा पुस्तक विक्रेत्यांसाठी तीन दिवसांचे सहा ते सात हजार रुपये भाडे संयोजकांनी घेतले. मात्र अनेकांचे स्टाॅलचे भाडेही निघाले नसल्याने प्रकाशकांना आर्थिक फटका बसला आहे.

यापूर्वी विदर्भातीलच यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्री जेमतेम झाली. काही प्रकाशकांच्या मते 15 टक्के, तर काहींच्या मते 50 टक्क्यांच्या आतबाहेरच पुस्तकांची विक्री झाली.

वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात 3 फेब्रुवारीला साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. साहित्य संमेलनांमध्ये होणारी पुस्तक विक्री आणि वाचकांची मागणी पाहता तसेच शेवटच्या दिवशी पुस्तक खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि वेळेअभावी अनेक वाचकांना हवी ती पुस्तके खरेदी करता येत नाहीत. त्यावर उपाय म्हणून साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी करण्या आले.

‘चार दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन’ असा नवीन पायंडा वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सुरू करण्यात आल्याची पाठ आयोजकांनी थोपटून घेतली. मात्र रसिकांनी संमेलनाकडेच पाठ फिरवल्याने पुस्तक विक्रीही जेमतेम झाल्याचे मौज प्रकाशनचे प्रतिनिधी मिलिंद जोशी यांनी सांगितले. अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत म्हाळगवे यांनी स्टाॅलचे भाडेही निघाले नसल्याचे सांगितले. तीन दिवसांचे सात हजार रूपये घेण्यात आले. विक्री मात्र जेमतेम चार हजाराची झाली. संस्कृती प्रकाशनचे सुनील मांडवे यांनीही नाराजी व्यक्त केली.

मेहता प्रकाशनचे संमेलनात तीन स्टाॅल्स आहे. त्यावर 12 ते 15 कर्मचारी आहे. आमचा वाहतूक खर्चही निघाला नसल्याचे विक्री अधिकारी सागर पवार यांनी सांगितले. तडाखेबंद विक्री होईल म्हणून तीन स्टाॅल्स लावले. पण, विक्रीच झाली नसल्याचा फटका बसल्याचे पवार यांनी सांगितले. एरव्ही कोणत्याही संमेलनात आमच्या एका स्टाॅलची एका दिवसाची विक्री दीड ते दोन लाखांची होते. मात्र वर्धा येथे तीन दिवसांची मिळून फक्त 50 हजार विक्री झाल्याचे पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...