आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात इडीकडून धाडसत्र:संदेश ग्रूपच्या कार्यालयावर, ओनरच्या घरावर छापा; जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी झाडाझडती

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात जमीन खरेदी प्रकरणाी ईडीने छापेमारी केली असून रामदास पेठ परिसरात ही कारवाई सुरू आहे. आर. संदेश ग्रुपवर हे छापे ईडीकडून टाकल्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई आज (ता. 3) सकाळपासून सुरू आहे.

रामदेव अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी

नागपूर येथे आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहीती आहे. आर संदेश ग्रुपच्या जमीन खरेदी प्रकरणात इडीने हे पाऊल उचलले आहे.

गौरी हाईट्स येथे छापेमारी

रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक आज सकाळी पोहचले. त्यानंतर त्यांनी बांधकाम आणि औषध क्षेत्राशी संबंधीत अग्रवाल यांच्या कार्यालयात व घरी चाचपणी सुरू केली. तसेच काही कागदपत्रे पडताळायला सुरूवात केली आहे.

नागपूरातील त्यांच्या काही जमीन व्यवहारांबाबत इडीने चौकशी आणि तपासणी सुरू केली असून ही कारवाई बराचवेळापासून सुरू आहे. मात्र, अद्याप यात ठोस माहीती समोर आली नसून ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल अद्याप ठोस माहिती दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...