आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीची सभा:नागपुरातील काँग्रेसच्या सभेला राहुल, प्रियंका गांधी उपस्थित राहणार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या सभा राज्यभरात होत असल्या तरी काँग्रेसच्या स्वतंत्र सभा होणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातून होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली.

देशभरात काँग्रेसच्या ६ सभा होणार आहेत. माजी खासदार राहुल गांधी, प्रियंका वढेरा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उपस्थिती राहणार आहे. याबाबत १० तारखेला ठाण्यात बैठक होईल. नागपुरातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. नंतर कर्नाटक निवडणुकीनंतर घेणार असून सहयोगी पक्षांच्या नेत्यांनादेखील निमंत्रण राहील, असे पटोले यांनी सांगितले. नागपूरची आघाडीची सभा होत असलेल्या मैदानाचाच विचार सुरू आहे.