आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट तपासणी‎ मोहिम:रेल्वेने तिकीट तपासणीत एका दिवसात‎ वसूल केला 17 लाख रुपये दंड‎

नागपूर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ रेल्वे विभागाने तिकीट तपासणी‎ मोहिमेत एका दिवसात १७ लाख ३० हजार रूपये‎ दंड वसूल केला.‎ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया‎ यांच्या नेतृत्वात आणि मुख्य विभागीय वाणिज्य‎ व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ‎ विभागात वाणिज्य विभाग व आर पी एफ विभाग‎ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी खंडवा ते‎ इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव -‎ धुळे; जलंब-खामगाव विभागाची एक दिवसीय‎ तिकीट तपासणी मोहीम राबवली.‎ वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि‎ आरपीएफ जवान यांचे संयुक्त पथक तयार‎ करून सुमारे ७० गाड्यांची तपासणी करण्यात‎ आली. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ,‎ खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही‎ तपासणी करण्यात आली. सेंट्रल रेल्वेची ही‎ मोहीम यशस्वी करण्यासाठी ३ अधिकारी, व‎ तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व‎ आरपीएफ स्टाफ अशा एकूण ४२ टीम तयार‎ करण्यात आल्या होत्या.‎ या टीमने सखोल तपासणी करून ३०२२‎ केसेसद्वारे एकूण १७ लाख ३० हजार वसूल केले‎ गेले. प्रवाशांनी प्रवास करताना योग्य ते तिकीट‎ घ्यावे व ज्या क्लासचे तिकीट आहे त्या‎ क्लासमध्ये प्रवास करावा असे आवाहन सेंट्रल‎ रेल्वेने केले आहे. लाईनमध्ये उभे न राहता‎ तिकीट हवे असेल तर प्रवाशांनी युटीएस ॲपचा‎ वापर करावा असे रेल्वे प्रशासनाने कळवले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...