आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या राजकीय समीकरणाची शक्‍यता:राज ठाकरे 17, 18 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी अलिकडे खूप वाढल्या आहेत. नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी असल्याचेही बोलले जात आहे. राज ठाकरे १७ आणि १८ सप्टेंबर असे दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. विदर्भातील मनसे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासोबतच आघाडीला धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढणार असल्याचे मानले जात आहे. सोबतच चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे येत्या १७ तारखेला नागपूरला येणार आहेत. येथून चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करतील. आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे.

इतर पक्षाचे लोक मनसेमध्ये प्रवेश करतील, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झालेली आहे. १७ आणि १८ सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे विदर्भात येणार आहे. या दौऱ्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील चार दिवस आधी नागपुरात तळ ठोकणार आहेत. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे सोबत लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. याचीच चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे नागपूरला येत असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...