आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:राज्यात रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही, आंबेडकरांनी एनडीएत यावे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्य आणि स्वबळावर सत्ता आणणे सध्या तरी शक्य नाही. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी एनडीएत यावे, असे आवाहन आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात रविवारी केले. आरपीआयच्या (आठवले) विदर्भ प्रदेश मेळाव्यासाठी आले असता आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय रिपब्लिकन ऐक्याचा विचार करणे अशक्य आहे. ते सोबत आले तरच ऐक्याला काही अर्थ आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडी नावाने वेगळा पक्ष आणि झेंडा केल्यामुळे रिपब्लिकन ऐक्य सध्या तरी शक्य नाही. हे लक्षात घेता वेगळे लढून मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी एनडीएत यावे. सोबत काम करायचे नसेल तर दोस्ती करून सत्ता मिळवावी, असे आठवले यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन ऐक्याचे यापूर्वी झालेले अनेक प्रयोग फसले याकडेही आठवले यांनी लक्ष वेधले.

शेतकरी आंदोलनासंदर्भात दिल्लीत जाऊन त्यांचे समर्थन करणार आहेत. ते स्वत: आधुनिक शेतकरी आहेत. आंदोलन वाढवण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांना समजवावे. तसेच सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास सकारात्मक असताना शेतकऱ्यांनीही ताणू नये. सरकार दोन पावले मागे येण्यास तयार आहे, तर शेतकऱ्यांनीही दोन पावले मागे यावे, असे आवाहन आठवले यांनी केले. काँग्रेसमुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. ते खरे आहे. तिथे पवारांवर अन्यायच झाला, म्हणून त्यांनीही एनडीएत यावे, असे आठवले म्हणाले.

मुंबईत आमचा उपमहापौर शक्य: मुंबई महापालिका निवडणूक आरपीआय आणि भाजपसोबतच लढवू. तिथे भाजपचा महापौर आणि आमचा उपमहापौर राहील. सत्तेतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आमचा डबल आणि दोन पक्ष एकत्र लढले तर सिंगल फायदा आहे, असे आठवले म्हणाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

राहुल आणि काँग्रेस एनडीएच्या फायद्याचे
काँग्रेसला संपवण्याचा कोणाचा कोणताही डाव नाही. उलट काँग्रेस पार्टी राहिलीच पाहिजे. कारण काँग्रेस व राहुल गांधींचे असणे एनडीएच्या फायद्याचे आहे. लोकसभेत आमचा एकही खासदार नाही. त्यामुळे विस्तारात कॅबिनेटपदी बढती मिळाली तर उत्तमच आहे. नाही मिळाली तरी तक्रार नाही. मिळाले त्यात मी समाधानी आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser