आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या उद्देशाने मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर 5 मे रोजी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमवारी राणा दाम्पत्य दिल्लीला गेले. आता राणा दाम्पत्याची 12 वर्षांची मुलगी आरोही आणि सहा वर्षांचा मुलगा रणवीर हे दोघेही आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत.
नागपूर विमानतळावरून हे दोघे बहिण-भाऊ नुकतेच दिल्लीला रवाना झाले. यावेळी मुलगी आरोही राणा हिचा ठाकरे सरकारवर टीका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत "हनुमान चालिसा वाचल्यामुळे माझ्या आई-वडीलांना कारागृहात टाकले होते, त्यांचा काय गुन्हा होता" असा सवाल आरोहीने ठाकरे सरकारला विचारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राणा दाम्पत्याला 5 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला, त्यानंतर नवनीत राणा यांना मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या सोमवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेण्यासाठी गेले होते. आता आपल्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्याची मुलं दिल्लीला निघाले आहेत. गेल्या 21 दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांना भेटले नव्हते. नागपूर विमानतळावरून दोन्ही मुले एकटेच दिल्लीकडे रवाना झाले आहेत. विमानात बसण्यापुर्वी त्यांनी एका व्हिडिओत दिलेल्या प्रतिक्रियेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राणा दाम्पत्याची 12 वर्षांची मुलगी आरोही म्हणाली की, "हनुमान चालिसा वाचल्यामुळे माझ्या आई-वडीलांना कारागृहात टाकले होते. त्यांचा काय गुन्हा होता? त्यांना मी मिस केले. मात्र आता त्यांना भेटायला आम्ही दिल्लीला चाललोय." असे म्हणत तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी अमरावतीहून मुंबईकडे निघाल्यापासून आरोही आणि रणवीर आपल्या आई-वडीलांपासून लांब आहेत. मात्र, राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर त्यांनी घरी न जाता दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटण्याचा निर्णय, त्यामुळे आता आरोही आणि रणवीर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
सोशल मीडियावर होत आहे टीका
दरम्यान, राणा दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. राजकारणापासून आपल्या मुलांना तरी अलिप्त ठेवायचे असते. कठीण आहे. ही क्लिप आल्यावर उभ्या घराचा जाहीर तमाशा केल्यासारखे वाटते, राणा कुटुबांने आता हात टेकले, अशा तीव्र शब्दात नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हा बाईट घेणाऱ्या राणांच्या कार्यकर्ते किंवा रिपोर्ट्सचे कौतुक करावे लागेल... त्यांनी हे बोलायचे शिकवून हा बाईट काढुन घेतलाय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.