आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:कर्जदार महिलेवर सावकाराचा घरात घुसून बलात्कार, नागपुरातील घटनेने खळबळ; आरोपी अटकेत

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांत तक्रार केल्यास पती व मुलीला जिवे मारण्याची दिली होती धमकी

सावकाराकडून काढलेले १० हजार रुपयांचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरलेल्या महिलेवर सावकाराने घरात घुसून अत्याचार केला. पोलिसांत तक्रार केल्यास पती व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना जुनी कामठी परिसरात घडली असून सावकाराला पोलिसांना अटक केली.

नरेश चेतराम चोकसे (वय ६०, रा. मोदी पडाव, कामठी) असे नराधम सावकाराचे नाव आहे. पीडित ४० वर्षीय महिला ही शेतमजूर असून पती व मुलीसह राहते. काही महिन्यांपूर्वी ती आर्थिक अडचणीत होती. मात्र तिची पैशांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे तिला सावकाराच्या दारात जावे लागले. सावकार चोकसे हा व्याजाने पैसे देत असल्याची माहिती तिला मिळाली. तिने नरेश याच्याकडून १० हजार रुपये व्याजाने घेत अडचण सोडवली. मात्र लॉकडाऊनमुळे सहा महिने हाताला काम नसल्याने पती-पत्नी बेरोजगार होते. कर्ज फेडण्यासाठी ती मजुरी करू लागली. मात्र तिच्यावर सावकार नरेश चोकसेची नजर गेली. त्याने पैशासाठी तगादा लावत तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. २२ ऑक्टोबरला आरोपी चोकसे अंजलीच्या घरी आला. शेतीवर मजूर पाहिजे असल्याचे सांगून तिला शेतात नेले. मात्र शेतात काम नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने घरी सोडून देण्यास सांगितले. त्याने तिच्याशी अश्लील चाळे करत थेट शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र प्रतिकार करत ती घरी परतली होती.

घरात घुसून बलात्कार; आरोपीस कोठडी

नरेश २३ ऑक्टोबरला घरी आला. त्याने घरात दुसरे कोणीच नाही ही संधी साधून अंजलीला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास शारीरिक सुखाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. नरेशने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला त्रास होईल, अशी धमकी दिली. मात्र धाडस करून तिने रावणदहनाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाणे जुनी कामठी येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून नरेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.